
SBI Share Price | स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.5 टक्क्यांच्या वाढीसह 728 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. स्टॉकमधील तेजी पाहून ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टने एसबीआय बँक स्टॉक बाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.
तज्ञांनी या बँकेचे शेअर्स पुढील 12 महिन्यांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका वर्षात एसबीआय बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एसबीआय बँक स्टॉक 3.70 टक्के वाढीसह 725.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
ब्रोकरेज फर्म ICICI Direct च्या तज्ञांनी SBI बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 800 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. एसबीआय बँक एफडीमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना एका वर्षात 6-7 टक्के व्याज देते.
मात्र मागील एका वर्षात एसबीआय बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकिंग स्टॉकने 728.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. एसबीआय बँकेचे एकूण बाजार भांडवल 6.46 लाख कोटी रुपये आहे.
एसबीआय बँकेची एडवांस ग्रोथ YOY आधारे 14.4 टक्के वाढली आहे. एसबीआय बँकेला रिटेल आणि SME सेगमेंट्समधून मजबूत फायदा झाला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एसबीआय बँकेची एडवांस ग्रोथ इंडस्ट्री वाढ 13-15 टक्के CAGR राहण्याची अपेक्षा आहे. मागील काही तिमाहीत एसबीआय बँकेने ऑपरेटिंग रेव्हेन्यू आणि मालमत्तेच्या गुणवत्तेच्या बाबतीत जबरदस्त कामगिरी केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, एसबीआय बँकेच्या व्यवस्थापन मंडळाला खात्री आहे की, पुढील काळात बँक आपली मार्जिन वाढ आणि मालमत्तेवरील परताव्यात सुधारणा करेल. तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एसबीआय बँकेचा RoA 1 टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.