30 April 2025 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

SJVN Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, PSU कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संयम देईल मोठा परतावा - Marathi News

Highlights:

  • SJVN Share PriceNSE: SJVN – एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश
  • महाराष्ट्र सरकार सोबत करारा
  • कंपनीमध्ये LIC ची गुंतवणूक
SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या (NSE: SJVN) शेअर्समध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे या कंपनीने महाराष्ट्र राज्य सरकारसोबत दोन सामंजस्य करार केले आहेत. (एसजेव्हीएन लिमिटेड कंपनी अंश)

या कराराअंतर्गत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला महाराष्ट्रात पंप्ड स्टोरेज प्रकल्प आणि फ्लोटिंग सोलर पावर प्लांट उभारायचे आहे. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी एसजेव्हीएन लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के घसरणीसह 131.22 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महाराष्ट्र सरकार सोबत करारा
मागील आठवड्यात एसजेव्हीएन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने सामंजस्य करार केला होता. या कराराअंतर्गत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला 5 पंप स्टोरेज प्रकल्प उभारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रकल्पाची एकूण ऊर्जा निर्मिती क्षमता 8100 मेगावॅट असेल. दुसऱ्या कराराअंतर्गत एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला 505 मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट उभारायचा आहे. या दोन प्रकल्पांचे एकूण मूल्य 48,000 कोटी रुपये आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 8400 जणांना थेट रोजगार मिळणार आहे.

कंपनीमध्ये LIC ची गुंतवणूक
मागील एका वर्षात एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 89 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास 10 टक्के वाढली आहे. एसजेव्हीएन लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 170.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 63.38 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 52,502.06 कोटी रुपये आहे. भारत सरकारने एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीचे 80 टक्केपेक्षा जास्त भागभांडवल धारण केले आहे. या कंपनीमध्ये एलआयसीने देखील मोठी गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SJVN Share Price 01 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या