 
						Skipper Share Price | स्कीपर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 309.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एका वर्षापूर्वी हा स्टॉक 90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी स्कीपर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.25 टक्के वाढीसह 326 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( स्कीपर लिमिटेड कंपनी अंश )
मागील एका वर्षात स्कीपर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 16.70 रुपये या आपल्या सर्वात नीचांक किंमत पातळीवरून 1795 टक्के वाढले आहे. 26 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 400 रुपये किंमत स्पर्श केली होती.
मागील 18 महिन्यांपैकी 12 महिन्यात स्कीपर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने सकारात्मक परतावा दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स तब्बल 510 टक्के वाढले आहेत. जून 2023 या एका महिन्यात स्कीपर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. फेब्रुवारी 2024 मध्ये स्कीपर लिमिटेड कंपनीला पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने नवीन 765 KV ट्रान्समिशन लाइन प्रकल्पाची रचना, पुरवठा आणि बांधकाम करण्यासाठी 737 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.
स्कीपर लिमिटेड ही कंपनी भारतातील सर्वात मोठी आणि जगातील एकमेव एकात्मिक T&D व्यवसाय करणारी कंपनी आहे. या कंपनीचे स्वतःचे उत्पादन, टॉवर लोड टेस्टिंग स्टेशन आणि ट्रान्समिशन लाइन ईपीसी केंद्र आहे. स्कीपर लिमिटेड कंपनीने लॅटिन अमेरिका, युरोप आणि आफ्रिका सारख्या खंडांमध्ये लक्षणीय व्यवसाय विस्तार केला आहे.
भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना आणि जल जीवन मिशन योजनेसाठी भरघोस अर्थसंकल्पीय तरतूद केल्याने भारतातील पाईप्सची मागणी वाढण्याची शक्यता आहे. स्कीपर लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत 4,020 दशलक्ष मूल्याच्या नवीन ऑर्डर मिळवल्या आहेत. कंपनीच्या ऑर्डर बुकचा एकूण आकार सध्या 57,790 दशलक्ष आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		