 
						Som Distilleries Share Price | सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज या बिअर बनवणाऱ्या कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज कंपनीने एका निवेदनात जाहीर केले की, त्यांना राजस्थान राज्य सरकारकडून बिअर विकण्याचा परवाना देण्यात आला आहे. म्हणजेच आता सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज लिमिटेड कंपनीची बिअर राजस्थान राज्यातील विकली जाणार आहे. (Som Share Price)
ही बातमी जाहीर होताच सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली. आणि शेअरची किंमत एका दिवसात 4.65 टक्क्यांनी वाढून 318 रुपयेवर पोहचली. आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज कंपनीचे शेअर्स 1.69 टक्के वाढीसह 310.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बियर उपभोगाच्या बाबतीत राजस्थान राज्य भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. राजस्थानमध्ये बियर मार्केट काबीज करण्याचा प्रयत्न सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज कंपनी करणार आहे. यासोबतच कंपनी देशातील इतर राज्यांमध्येही व्यापार विस्तार करणार आहे. सोम डिस्टिलरीज अँड ब्रेवरीज लिमिटेड कंपनीला राजस्थानमध्ये बियर विक्रीचा परवाना मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली.
सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 319.70 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 69.87 रुपये होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स उच्चांक किंमत पातळीजवळ पोहोचले होते.
15 जुलै 2022 रोजी सोम डिस्टिलरीज अॅड ब्रेवरीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 69.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्सची किंमत चार पटीहून जास्त वाढली आहे. मागील 6 महिन्यांत हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 151.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 20.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 332.14 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		