16 May 2024 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500 Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय
x

Stock To Buy | ब्रोकरेज फर्म शेअरखानने निवडले 5 बेस्ट स्टॉक, वर्षभरात देतील बंपर परतावा, लिस्ट सेव्ह करा

Stocks to Buy

Stock To Buy | जागतिक बाजारात नकारात्मक संकेत, आर्थिक मंदीची भीती असतानाही आणि चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजार हिरव्या निशाणीवर व्यवहार करताना पाहायला मिळाला आहे. जगात आर्थिक मंदी सदृष्य वातावरण असताना, बहुतांश भारतीय कंपन्यांनी प्रॉफीटेबल तिमाही निकाल जाहीर केले आहेत. 9 नोव्हेंबर 2022 रोजी बँक निफ्टी निर्देशांकाने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. याशिवाय सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकातही कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. दरम्यान अनेक कंपन्यांची चांगले तिमाही निकाल जाहीर केले असून, ब्रोकरेज फर्म्सनी त्यात बिनधास्त गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी 5 दर्जेदार स्टॉकची निवड केली आहे. या स्टॉकमध्ये ब्रोकरेज फर्म शेअरखानने बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असून पुढील काळात हे स्टॉक अप्रतिम परतावा कमावून देतील असा अंदाजही व्यक्त केला आहे.

Coromandel International :
भारतीय प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म शेअरखानने आपल्या ग्राहकांना कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. भरघोस परतावा कमवायचा असेल तर प्रति शेअर 1155 रुपये या लक्ष्य किंमतसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला शेअरखानने दिला आहे. 10 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर 943 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअर्समध्ये गुंतवणुक केल्यास अल्पावधीत तुम्ही प्रति शेअर 212 रुपये म्हणजेच 22 टक्क्यांपर्यंत नफा कमवू शकता.

City Union Bank :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने सिटी युनियन बँकेचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. शेअरखानने या कंपनीचे शेअर्स प्रति शेअर 230 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 10 नोव्हेंबर 2022 रोजी City Union बँकेचे शेअर 190 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रति शेअर 40 रुपये म्हणजेच 17-18 टक्के नफा कमावता येईल.

Blue Star :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने आपल्या ग्राहकांना ब्लू स्टार कंपनीचे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरवर 1410 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. 10 नोव्हेंबर 2022 रोजी ब्लू स्टार कंपनीचे शेअर 1200 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुंतवणूकदारांनी सध्याच्या ट्रेडिंग किमतीवर हे स्टॉक खरेदी केले तर त्यांना प्रति शेअर 210 रुपये म्हणजेच 16 टक्के अधिक नफा मिळू शकतो.

JK Lakshmi Cement :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने जेके लक्ष्मी सिमेंट कंपनीचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने हा स्टॉक 750 रुपये या लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 10 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचा शेअर 658 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. गुंतवणूकदार या शेअरमध्ये पैसे लावून प्रति शेअर 90-92 रुपये म्हणजेच 13 टक्के नफा कमवू शकतात.

Axis Bank :
ब्रोकरेज फर्म शेअरखान अ‍ॅक्सिस बँकेच्या शेअर्सवर उत्साही असून त्यांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने अ‍ॅक्सिस बँकेच्या शेअरवर 1040 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. 10 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचा शेअर 845 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. अशा प्रकारे, गुंतवणूकदार या स्टॉक मध्ये पैसे लावून 195 रुपये प्रति शेअर म्हणजेच 19 टक्क्यांपेक्षा अधिक नफा कमवू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Stocks to Buy Recommended by Sharekhan Brokerage firm for short term return on 11 November 2022.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x