
South Indian Bank Share Price | ‘साऊथ इंडियन बँक’ च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘साऊथ इंडियन बँक’ चे शेअर 10 टक्क्यांच्या वाढीसह 17.66 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. डिसेंबर 2022 मध्ये ‘साऊथ इंडियन बँक’ शेअरने 21.80 रुपये ही उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी ‘साऊथ इंडियन बँक’ चे शेअर्स 3.12 टक्के घसरणीसह 17.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
स्टॉकमधील तेजीचे कारण :
मार्च 2023 तिमाहीच्या मजबूत निकालांमुळे ‘साऊथ इंडियन बँक’ चे शेअर्स तेजीत वाढत आहेत. मार्च 2023 च्या तिमाहीत ‘साऊथ इंडियन बँक’ 22.74 टक्के वाढीसह 333.89 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत ‘साऊथ इंडियन बँक’ ने 272.04 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. साऊथ इंडियन बँकेचा ऑपरेटिंग प्रॉफिट 95 टक्क्यांच्या वाढीसह 561.55 कोटी रुपयेवर पोहोचला आहे, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीत 287.94 कोटी रुपये ऑपरेटिंग प्रॉफिट नोंदवला आहे.
‘साऊथ इंडियन बँक’ चे निव्वळ व्याज उत्पन्न 825.15 कोटी वरून वाढून 857.18 कोटी रुपयेवर पोहचले आहे. तिमाही आधारावर बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात 3.88 टक्के वाढ झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात ‘साऊथ इंडियन बँक’ ने 775.09 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीचे तुलनेत 1,623.11 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
‘साऊथ इंडियन बँक’ चा ग्रॉस एनपीए वार्षिक आधारावर 5.90 टक्के वरून 76 bps ने घटला असून 5.14 टक्केवर आला आहे. बँकेचा निव्वळ NPA 2.97 टक्क्यांवरून 111 bps ने घसरुन 1.86 टक्क्यांवर आला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी 1 च्या दर्शनी मूल्याच्या शेअरवर 0.30 रुपये प्रति इक्विटी शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.