 
						Stock in Focus | भारत आणि जगभरातील विविध देश हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध करार करत आहेत. पॅरिसच्या जाहीरनाम्यात जगभरातील देशांनी कार्बन उत्सर्जन 2 टक्के कमी करण्याबाबत सहमती दर्शवली होती. आता भारत आणि अमेरिकेने कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे.
या दोन्ही देशांनी ‘रिन्यूएबल इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड’ स्थापन करून त्यात 500-500 दशलक्ष डॉलर्स योगदान देण्याची घोषणा केली आहे. म्हणून या सकारात्मक बातमीच्या पार्श्वभूमीवर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अक्षय ऊर्जेशी संबंधित अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले होते. आज या लेखात आपण या कंपन्यांची कामगिरी पाहणार आहोत.
INOX विंड लिमिटेड
या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6703.13 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 200 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 192.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड
चालू आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह अप्पर 388.50 रुपये किमती वर ट्रेड करत होते. ही कंपनी सध्या तुर्कीमध्ये सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पावर काम करत आहे. आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के घसरणीसह 363.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
वेबसोल एनर्जी सिस्टम लिमिटेड
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 139.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 540.84 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के घसरणीसह 139.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 437 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.03 टक्के घसरणीसह 389.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		