3 May 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा
x

Penny Stocks | पुरी लाईफ बदल डाली, या शेअरमध्ये गुंतवलेल्या 12 हजार रुपयाचे कोटीत रूपांतर झाले, असे स्टॉक लक्षात ठेवा

Multibagger Stock

Penny Stocks| शेअर बाजारातून पैसे कमवायचे असेल त्यासाठी तुम्हाला खूप संयम ठेवावा लागेल. स्टॉक मार्केट मध्ये पैसे शेअर्सची खरेदी-विक्री करून मिळत नसतात तर जास्तीत जास्त काळ स्टॉक होल्ड करून मिळतात. दीर्घ मुदतीत, अनेक कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीच्या शेअरने तर आपल्या शेअरधारकांना अवघ्या 20 वर्षांत करोडपती केले आहे. मागील 20 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या भागधारकांना 84,000 टक्के परतावा कमावून दिला आहे.

19 जुलै 2002 रोजी कामा होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स बीएसईवर पहिल्यांदा लिस्ट झाले होते, तेव्हा शेअर्स फक्त 15.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या शेअर्समध्ये 84,414 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. 20 ऑक्टोबर 2022 मध्ये हा स्टॉक BSE निर्देशांकावर 13,099.70 रुपये किमतीवर बंद झाला होता. 21 ऑक्टोबर 2022 रोजी कामा होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स इंट्राडे सेशनमध्ये 0.95 टक्क्यांनी कमजोर झाले आणि त्यावेळी स्टॉक 13,108 रुपयांवर ट्रेड करत होता.

गुंतवणुकीवर परतावा :
या स्टॉक मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. कामा होल्डिंग्जच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. मागील 20 वर्षात स्टॉकमध्ये 84,414 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांत या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 379 टक्के परतावा कमावून दिला आहे. पाच वर्षांपूर्वी हा शेअर 2732.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक 13,108 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षभरात या शेअरच्या किमतीत 24.94 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत हा स्टॉक सुमारे 23 टक्क्यांनी वर गेला आहे. मागील 6 महिन्यांत कामा होल्डिंग्ज कंपनीच्या शेअरची किमत 15 टक्के वाढली आहे. मागील 1 महिन्यात या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत 1.42 टक्क्यांनी वर गेली आहे.

जर तुम्ही या स्टॉकमध्ये 20 वर्षांपूर्वी 12 हजार रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आज तुम्ही करोडपती झाला असता. आज त्या 12 हजार रुपयांचे मूल्य 1 कोटी पेक्षा रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही जुलै 2002 मध्ये कामा होल्डिंग्ज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य 8 कोटी 45 ​​लाख रुप झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Kama Holdings share price return in investment on 23 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x