6 May 2025 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Stock in Focus | दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग! वर्षभर लक्ष्मी प्रसन्न राहील, हा शेअर खरेदी करून पुढच्या दिवाळीपर्यंत मालामाल व्ह्या

Stock in Focus

Stock in Focus | सध्या भारतात दिवाळी सणाची लगबग सुरू आहे. दरवर्षी भारतीय शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी संध्यकाळी 1 तासासाठी मुहूर्त ट्रेडिंग सेशन भरवला जातो. या ट्रेडिंग सेशनमध्ये गुंतवणुकदार धरे बाजारात काही पैसे गुंतवणूक करतात. आतापासून अनेक गुंतवणुकदारांनी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक शोधायला सुरुवात केली आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला असाच स्टॉक सांगणार आहोत, जो तुम्ही दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये खरेदी करू शकता. या स्टॉकचे नाव आहे, मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स. या कंपनीचे शेअर्स मागील महिन्यात शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के घसरणीसह 305.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ज्या गुंतवणूकदारांनी मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावले होते, त्यांना काही खास फायदा झाला नव्हता. मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 215 रुपये फ्लॅट किमतीवर सूचीबद्ध झाले होते. 9 ऑक्टोबर 2023 रोजी मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 322.40 रुपये किमतीवर पोहचले होते. परिस्थितीत ज्या गुंतवणूकदारांनी आपले शेअर्स होल्ड करून ठेवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मुख्य आता 50 टक्के वाढले आहे.

मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 204 रुपये ते 215 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. स्टॉक लिस्टिंग झाल्यानंतर शेअरमध्ये घसरण झाली होती. मात्र नंतर शेअर तेजीत आला आणि शेअरने 322 रुपये ही नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती.

या कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किंमत पातळीवरून 60 टक्के मजबूत झाले आहेत. प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, सणासुदीच्या वातावरणामुळे भारतात दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवाळीमुळे मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनी चालू तिमाहीत चांगली कामगिरी करेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock in Focus today on 10 November 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या