
Stock in Focus | भारतीय शेअर बाजार मागील एक महिन्यापासून अस्थिर असून त्यात बरेच चढ उतार पाहायला मिळत आहे. याकाळात मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पडझड पाहायला मिळत आहे. परंतु या कालावधीत 3 कंपन्याच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. हे शेअर आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श करण्यात यशस्वी झाले आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | APL Apollo Tubes Share Price | Cummins India Share Price | Finolex Cables Share Price)
फेनोलेक्स केबल्स :
मागील एका महिनाभरात जा गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 22 टक्क्यांनी वाढले आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के वाढीसह 680.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची बाबांना आठवड्याची उच्चांक पातळी किंमत सातशे रुपये होती.
अपोलो ट्यूब्स :
मागील एका महिनाभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 9.82 टक्के वधारली आहे. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 11 टक्क्यांनी वाढले आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1237.80 रुपये होती. तर शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी अपोलो ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 2.68 टक्के घसरणीसह 1,285.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कमिन्स इंडिया :
मागील एका महिन्यात ज्या लोकांनी कमिन्स इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना जबरदस्त नफा झाला आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी कमिन्स इंडिया कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के घसरणीसह 1,619.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 1633 रुपये प्रति शेअर होती. मागील एका वर्षात या स्टॉक ने आपल्या शेअर धारकांना 16.90% परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.