
Stocks To Buy | या वर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गुंतवणूक करून पुढच्या वर्षीच्या दिवाळी पर्यंत कोणते स्टॉक आपले पैसे अनेक पटींनी वाढवतील, हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. तर आता काळजी करू नका. IIFL सिक्युरिटीज ने आपल्या ग्राहकांसाठी असे काही स्टॉक निवडले आहेत जे पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत तुमची गुंतवणूक अनेक पटीने वाढवतील. हे शेअर्स पुढील एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करतील असा आंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक बद्दल सविस्तर
1) फेडरल बँक :
2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत फेडरल बँक कंपनीचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. IIFL ने आपल्या अहवालात या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदार पैसे गुंतवू शकतात. पुढील दिवाळीपर्यंत या बँकेच्या शेअरची किंमत 230 रुपयांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे.
2) रेणुका शुगर :
चलन बाजारात कमजोर होत असलेल्या रुपयाच्या किमतीमुळे साखर कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. त्यातही रेणुका शुगरची कामगिरी सकारात्मक दिसत आहे. या वर्षी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये या शेअरवर पैसे लावणारे लोक पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत मालामाल होऊ शकतात असा अंदाज IIFL securities कडून व्यक्त करण्यात आला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 120 रुपयांपर्यंत वाढू शकते असा अंदाज आहे.
3) कोल इंडिया लिमिटेड :
IIFL securities ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, कोल इंडिया ही PSU सेगमेंटमध्ये भरघोस लाभांश देणारी कर्जमुक्त कंपनी आहे. शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला त्यात अपट्रेंड दिसेल. या कंपनीचे शेअर्स पुढच्या दिवाळी पर्यंत 238 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत वाढू शकतात.
4) DLF :
कोविड-19 च्या लॉकडाऊन नंतर आता पुन्हा एकदा रिअल इस्टेट बाजाराच्या परिस्थितीत सुधारणा पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत DLF कंपनीचे शेअर्स पुढील येणाऱ्या काळात तेजीत वाढण्याची शक्यता आहे. या स्टॉकची टार्गेट किंमत 600 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
5) इंडियन हॉटेल कंपनी :
कोविड च्या विळख्यातून बाहेर आपल्यावर आता पुन्हा एकदा हॉटेल उद्योगाची स्थिती सुधारताना दिसत आहे. या शेअरचे चार्ट पॅटर्नवरही सकारात्मक वाढ दाखवत आहे. IIFL securities ने इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरची किंमत पुढील दिवाळी पर्यंत 255 रुपयांवरून 500 रुपयांवर जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.