
Suzlon Energy Share Price | मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी वाढली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 17 टक्के वाढीसह 14.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील 3 दिवसात 30 टक्के मजबूत झाले आहेत.
सुझलॉन एनर्जी शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5.43 रुपये होती. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या कामगिरीत सुधारणा केल्याने स्टॉकमध्ये तेजी पहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के घसरणीसह 13.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
3 वर्षात 700 टक्के परतावा
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 707 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 14.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.33 लाख रुपये झाले असते.
11 महिन्यांत 153 टक्के वाढ
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 11 महिन्यांत 153 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 28 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.58 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7 जून 2023 रोजी 14.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 45 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनीचे ग्रुप सीईओ जेपी चालसानी यांनी सांगितले की कंपनीकडे सध्या 1542 मेगावॅट प्रकल्प निर्मितीची ऑर्डर आहे. या ऑर्डरमध्ये 31 मार्च 2023 पर्यंत 652 मेगावॅट प्रकल्प निर्मितीची ऑर्डर आणि 890 मेगावॅट प्रकल्प निर्मितीची ऑर्डर देखील सामील आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.