
Suzlon Share Price | सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर सुझलॉन एनर्जी शेअर पुन्हा तेजीत (NSE: SUZLON) आला आहे. मागील पाच दिवसात सुझलॉन शेअर २२ टक्क्यांनी घसरला होता. गुरुवारी सुझलॉन शेअर 5 टक्क्यांनी वधारून 56.73 रुपयांवर बंद झाला होता. मात्र, वर्षभरातील उच्चांकी पातळीच्या तुलनेत सुझलॉन शेअर अजूनही ३४ टक्क्यांनी खाली आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
12 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 86.04 रुपयांच्या १ वर्षाच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. तर गेल्या वर्षी 21 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 33.83 रुपयांच्या १ वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता.
सुझलॉन शेअर ‘ओव्हरसोल्ड’ झोनमध्ये
सुझलॉन शेअर टेक्निकल चार्टवर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स बुधवारी ५ दिवसांच्या विक्रीमुळे २३ पर्यंत घसरला आहे. याचा अर्थ सुझलॉन शेअर ‘ओव्हरसोल्ड’ झोनमध्ये आला आहे. जुलै २०२४ मध्ये शेअर ८६ च्या पातळीवर पोहोचला होता, तो आता ‘ओव्हरबाईंग’ होण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी सुझलॉन शेअर्सनी वेग घेतला आहे, परंतु २९ च्या RSI नुसार अजूनही ‘ओव्हरसोल्ड’ झोनमध्ये आहेत.
सुझलॉन शेअर – ‘BUY’ रेटिंग
दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीने उत्तम कामगिरी केली आहे. वार्षिक आधारावर सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा महसूल ४८ टक्क्यांनी वाढून २१०३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफाही १०२ कोटी रुपयांवरून २०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी पाच विश्लेषकांपैकी तिघांनी ‘HOLD’ रेटिंग दिली आहे, तर दोन विश्लेषकांनी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात सुझलॉन शेअर 23.04% घसरला आहे. मागील ६ महिन्यात सुझलॉन शेअरने 34.43% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन शेअरने 40.07% परतावा दिला. मागील ५ वर्षात या शेअरने 2,421% परतावा दिला. तसेच YTD आधारावर सुझलॉन शेअरने 47.35% परतावा दिला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.