
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी-मंदीचे चक्र पाहायला मिळत आहे. सध्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये होणारी वाढ नुकताच जारी करण्यात आलेल्या बिझनेस अपडेटमुळे पाहायला मिळत आहे. मार्च 2024 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीचा ब्रिटीश युनिट Jaguar Land Rover ने वार्षिक विक्रीत 11 टक्के वाढ नोंदवली आहे. याकाळात कंपनीने 1.14 लाख युनिटची विक्री केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
मार्च 2024 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीची यूके मधील विक्री मागील वर्षीच्या तुलनेत 32 टक्के वाढली आहे. तर उत्तर अमेरिकेत 21 टक्के आणि इतर देशात 16 टक्के वाढली आहे. मात्र चीनमधील विक्रीत 9 टक्के आणि युरोपमधील विक्रीत 2 टक्के घट झाली आहे. आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.35 टक्के वाढीसह 1,012.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
Jaguar Land Rover कंपनीच्या विक्रीत मागील एका आर्थिक वर्षात 20 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे घाऊक विक्रीचे प्रमाण वार्षिक 25 टक्के वाढीसह 4,01,303 युनिट नोंदवले गेले आहे. कंपनीची रिटेल व्हॉल्यूम वार्षिक आधारावर 22 टक्के वाढीसह 4,31,733 युनिट्स नोंदवली गेली आहे.
मार्च तिमाहीतील बिझनेस अपडेटनंतर, मॉर्गन स्टॅनली फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन 1020 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली होती. ब्रोकरेज फर्मच्या मते, इलेक्ट्रिक वाहनांच्या दरात घट झाल्यामुळे टाटा मोटर्स कंपनीला फ्री कॅश फ्लोच्या बाबतीत फायदा होऊ शकतो. मार्च 2024 तिमाहीत प्रीमियम मॉडेल्सच्या बाबतीत JLR थोडा कमकुवत राहिला होता. या तिमाहीत कंपनीचा प्रॉफिट मार्जिन 9.1 टक्के राहण्याची शक्यता आहे.
मॅक्वेरी या ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकवर ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग देऊन 1028 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. मार्च तिमाहीत कंपनीची घाऊक विक्री थोडी चांगली राहिली आहे. तसेच कंपनीचा EBITDA मार्जिन तिमाही आधारावर स्थिर राहिला आहे. टाटा मोटर्स कंपनीने आपले निव्वळ कर्ज कमी करण्याचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. आणि कंपनीने 2024 पर्यंत आपले कर्ज 1 अब्ज पौंडांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते.
नोमुरा फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सवर ‘BUY’ रेटिंग देऊन 1057 रुपये टार्गेटसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नोमुरा फर्मचा अंदाज आहे की पुढील तिमाहीत JLR कंपनीचा फ्री कॅश फ्लो 600-700 दशलक्ष पौंडपर्यंत वाढू शकतो. यामुळे टाटा मोटर्स कंपनीला आपले कर्ज कमी करता येईल. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 122 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.