
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्स कंपनीने प्रति शेअर 2 रुपये आणि अनओर्डिनरीवर 2 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्स कंपनीने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.76 टक्क्यांच्या वाढीसह 569 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 567.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
टाटा मोटर्स लाभांग रेकॉर्ड तारीख
सेबीला दिलेल्या माहितीत टाटा मोटर्स कंपनीने कळवले आहे की, कंपनीने लाभांश वाटप करण्यासाठी 29 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारीख पर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल, कंपनी अशा गुंतवणुकदारांना लाभांश देईल.
मागील एका महिन्यात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत 6.56 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 2023 च्या सुरुवातीला टाटा मोटर्स स्टॉक खरेदी केला होता, त्यांना आता 43.28 टक्के नफा मिळाला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 576.65 रुपये होती.
टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समधील तेजीचे कारण म्हणजे, कंपनीने जबरदस्त तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यासोबत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO च्या बातमीने टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक तेजीत आला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ ऑफ फॉर सेल अंतर्गत लाँच करण्यात येणार आहे.
या कंपनीत टाटा मोटर्स कंपनीने मोठी गुंतवणुक केली आहे. या आयपीओच्या माध्यमातून टाटा मोटर्स कंपनी आपले शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. यातून टाटा मोटर्स कंपनीला मोठा फायदा होणार आहे. यामुळे टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.