Tata Power Share Price | भारतातील डेटा सेंटरची क्षमता 30% वाढणार, टाटा पॉवर सहित हे 3 शेअर्स ठरणार फायद्याचे - Marathi News
Highlights:
- Tata Power Share Price
- पॉवर सेक्टरमधील स्टॉक्स
- भारतातील डेटा सेंटरची क्षमता 10 वर्षात 30% वाढू शकते
- शेअरची टारगेट प्राईस

Tata Power Share Price | शेअर बाजारातील तज्ञांच्या मते पॉवर सेक्टरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या अहवालानुसार, विद्युतीकरण हा केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनला आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा सेंटर्सच्या मागणीमुळे पॉवर सेक्टरमध्ये नवीन उत्साह पाहायला मिळत आहे.
मागील एका वर्षात पॉवर सेक्टरमधील टॉप 4 शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 221 टक्के ते 103 टक्के परतावा कमावून दिला आहे. यामध्ये सुझलॉन एनर्जी, टोरेंट पॉवर, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स आणि अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
पॉवर सेक्टरमधील स्टॉक्स
गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देणाऱ्या पॉवर स्टॉकमध्ये ABB India, Siemens, Tata Power Company, JSW Energy, Power Grid Corporation, NTPC, NHPC, CG Power & Industrial Solutions आणि Adani Power या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. या स्टॉकनी आपल्या गुंतवणूकदारांना 94 टक्के ते 75 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के घसरणीसह 481 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
भारतातील डेटा सेंटरची क्षमता 10 वर्षात 30% वाढू शकते
रेलीगेअर स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, मागील काही वर्षांत पॉवर उद्योगाने लक्षणीय कामगिरी केली आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांच्या मते, पॉवर सेक्टरमध्ये 40 लाख कोटी रुपये गुंतवणुकीची संधी आहे. ब्रोकरेज फर्मचा अंदाज आहे की भारतातील डेटा सेंटरची क्षमता पुढील 10 वर्षात 30 टक्के वाढू शकते. तसेच नवीन वाहनांची विक्री दहा वर्षात 60 टक्के आणि प्रवासी व व्यावसायिक वाहनांची विक्री 60 टक्के वाढू शकते.
शेअरची टारगेट प्राईस
बीएसई पॉवर इंडेक्समधील पॉवर स्टॉक्स सप्टेंबर महिन्यात 6.22 टक्के वाढले आहेत. मागील 10 वर्षांमध्ये, बीएसई पॉवर इंडेक्स सलग 9 वर्ष वाढला आहे. या निर्देशांकाने सर्वोत्तम कामगिरी 2014 मध्ये नोंदवली होती. 2014 मध्ये हा बेंचमार्क निर्देशाक 9.5 टक्के वाढला होता. मोतीलाल ओसवालने पॉवर सेक्टरमधील पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू एनर्जी, टाटा पॉवर हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्सवर तज्ञांनी 425 रुपये टार्गेट प्राईज जाहीर केली आहे. तर जेएसडब्ल्यू एनर्जी स्टॉकवर तज्ञांनी 917 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते टाटा पॉवर स्टॉक पुढील काळात 530 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Power Share Price 01 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER