Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि सुझलॉन सहित या शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग, टार्गेट प्राईस अपग्रेड – Marathi News

Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स इंडेक्स मंगळवारी 82,988.78 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 25,383.75 अंकावर पोहचला होता. अशा काळात तज्ञांनी एक अहवाल प्रसिद्ध करून त्यात टॉप 3 शेअर्सबाबत विश्लेषण जाहीर केले आहे. यामध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड, टाटा स्टील लिमिटेड आणि बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.

सुझलॉन एनर्जी :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 90 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 71 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.12 टक्के घसरणीसह 81.08 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा स्टील :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 165 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 147.50 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.55 टक्के घसरणीसह 150.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बजाज फायनान्स :
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 7200 रुपये या आपल्या सपोर्ट लेव्हलच्या जवळ जाऊ शकतो. म्हणून सध्या तज्ञांनी हा स्टॉक टाळण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.60 टक्के वाढीसह 7,630.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर मंदीचा पॅटर्न तयार झाला आहे. त्यामुळे या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळू शकतो.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 18 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.