 
						Tata Steel Share Price Today | नुकताच ‘टाटा स्टील’ कंपनीने आपले आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. अनेक तज्ञ या कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही आहेत. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज आणि नुवामा फर्मने ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल या स्टॉकबाबत तटस्थ आहेत. ‘टाटा स्टील’ कंपनीने जानेवारी ते मार्च या तिमाहीत 1 हजार 705 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मात्र, मागील वर्षीच्या 9 हजार 756 कोटी रुपये नफ्याच्या तुलनेत या वर्षीचा निव्वळ नफा 82 टक्के कमी आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.12 टक्के घसरणीसह 108.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या महसूलात 9 टक्क्यांची घट झाली असून कंपनीने 62 हजार 961 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 69 हजार 323 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकवर 6.4X EV/EBITDA मार्च 2025 च्या मूल्यांकनासह 130 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा स्टील स्टॉक 5.5x EV/EBITDA FY2025 वर ट्रेड करत आहे. टाटा स्टील आकर्षक रिस्क-रिवॉर्ड ऑफर करत असून ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने यावर 110 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.
तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, इनपुट खर्च आणि करांसाठी सुधारित दृष्टीकोन विचारात घेऊन तज्ञांनी लक्ष किमतीत किरकोळ वाढ केली आहे. टाटा स्टील स्टॉक 5.6X FY24 EV/EBITDA आणि 1.3X FY24 P/B वर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्म नुवामाने टाटा स्टील कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉकवर 131 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.
ब्रोकरेज फर्मने सांगितले की FY24 मध्ये EBITDA 14,844 आणि FY25 मध्ये 16,072 रुपये राहण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म नुवामाच्या मते आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत टाटा स्टील कंपनीचा तोटा कमी होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		