
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स नुकताच सूचीबद्ध झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.64 टक्क्यांच्या घसरणीसह 1239 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स आपल्या आयपीओ किमतीच्या दुप्पट वाढले आहेत. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO स्टॉक 140 टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध झाला होता. शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक 7.39 टक्के घसरणीसह 1,216 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 1200 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तज्ञांच्या मते, कंपनीच्या आउटसोर्सिंग व्यवसायात वाढीची शक्यता निर्माण झाल्याने, आगामी काळात टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या व्यवसाय मॉडेलला मोठी मागणी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे कंपनीचे उत्पन्न आणि नफा अनेक पट वाढू शकतो. म्हणून शेअर बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना टाटा टेक्नॉलॉजी स्टॉक दीर्घ मुदतीसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. आनंद राठी फर्मच्या तज्यनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स दीर्घकाळ होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO हा टाटा समूहाचा 20 वर्षांनंतर आलेला IPO होता.
ग्रे मार्केटमध्ये देखील या IPO स्टॉकने जबरदस्त कामगिरी केली होती. स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट करणाऱ्या टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकमध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणात नफा वसुली पाहायला मिळाली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.