
Train Ticket Concession | ज्येष्ठ नागरिकांना यापुढे रेल्वेच्या तिकिटातून सूट दिली जाणार नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, भारतीय रेल्वेने दिव्यांगजनांच्या चार श्रेणी, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या ११ श्रेणींसाठी भाड्यात सवलत देणे सुरूच ठेवले आहे.
रेल्वे मंत्री काय म्हणाले :
एम. आरिफ यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणाले, ‘ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांच्या प्रवासाच्या खर्चापैकी ५० टक्क्यांहून अधिक खर्च भारतीय रेल्वे आधीच उचलत आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेची कमाई कोविड-19 मुळे 2019-20 च्या कमाईपेक्षा कमी होती. रेल्वेच्या आर्थिक स्थितीवरही त्याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांसह अनेक प्रवर्गांना भाडे सवलतीची व्याप्ती वाढवणे योग्य नाही, असे वैष्णव यांनी सांगितले.
कोरोना काळात कमी झालेले प्रवासी :
आकडेवारीनुसार, २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या कालावधीत आरक्षित वर्गात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची संख्या अनुक्रमे ६.१८ कोटी, १.९० कोटी आणि ५.५५ कोटी होती. गेल्या दोन वर्षांत ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील प्रवासी संख्येत झालेली घट ही कदाचित कोविड-19 महामारीमुळे झाली आहे.
2019-20 या वर्षात सुमारे 22.6 लाख ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी रेल्वेच्या शाश्वत विकासासाठी प्रवासी भाडे सवलत योजना सोडण्याचा पर्याय निवडला होता, अशी माहितीही रेल्वेमंत्र्यांनी सभागृहात दिली.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.