 
						Trident Share Price | ट्रायडेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षांत ट्रायडेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3,600 टक्के परतावा कमावून दिला आहे.
जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी ट्रायडेंट लिमिटेड स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4 लाख रुपये झाले असते. दहा वर्षांपूर्वी ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 80 पैसेवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 33.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील पाच वर्षांत ट्रायडेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 480.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत ट्रायडेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 665 टक्के परतावा कमावून दिला आहे. ट्रायडेंट लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 17,000 कोटी रुपये आहे.
ट्रायडेंट लिमिटेड ही कंपनी मुख्यतः कापड, कागद, धागा आणि रसायने बनवण्याचे काम करते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये टॉवेल्स, गव्हाच्या पेंढ्यापासून प्रिंटिंग पेपर, विणकाम आणि होजरी यार्न, सल्फ्यूरिक ऍसिड यांसारखे उत्पादने सामील आहेत. कंपनीची बहुतांश कमाई निर्यात व्यवसायातून होते.
सेबीकडे उपलब्ध असलेल्या शेअर होल्डिंग डेटानुसार, ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे बहुतांश भाग भांडवल प्रवर्तकांनी धारण केले आहेत. त्याच्याकडे कंपनीचे एकूण 73.19 टक्के भाग भांडवल आहे. तर सार्वजनिक भाग धारकांनी कंपनीचे 25.56 टक्के स्टॉक धारण केले आहेत. कंपनीच्या सार्वजनिक शेअर धारकांमध्ये म्युच्युअल फंड आणि परकीय गुंतवणूकदारांनी मोठा 25.56 टक्के शेअर्स होल्ड केले आहेत. तर कंपनीच्या किरकोळ गुंतवणूकदारांनी कंपनीचे 18 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
वार्षिक आधारावर ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचा EPS 0.83 अंकावर आहे. तर स्टॉक सध्या 4.56 च्या PB प्रमाणावर ट्रेड करत आहे. 10 वर्षापूर्वी म्हणजेच FY- मध्ये ट्रायडंट कंपनीने 3,868 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर FY23 मध्ये कंपनीने 6,332 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा दुप्पट झाला असून 441 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		