
Udayshivakumar Infra Share Price | ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ या स्मॉल कॅप कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी शानदार प्रतिसाद दिला आहे. ग्रे मार्केटमध्येही ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनीच्या शेअर्सला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केट मध्ये 18 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 33-35 रुपये निश्चित केली होती. ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनीचा IPO 20 मार्च 2023 ते 23 मार्च 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. (Udayshivakumar Infra Limited)
‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनीचे IPO शेअर्स 28 मार्च 2023 रोजी वाटप केले जातील. या कंपनीचे शेअर्स लिस्टिंग च्या दिवशीच 50 टक्के पेक्षा जास्त किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. या कंपनीचे शेअर्स 35 रुपये प्राइस बँडवर वाटप होण्याची शक्यता आहे. जर हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 18 रुपये प्रीमियम किमतीवर टिकुन राहिला तर ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनीचे शेअर्स 53 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशी 52 टक्के नफा मिळू शकतो. या कंपनीचे शेअर्स 3 एप्रिल 2023 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होतील.
‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनीचा IPO एकूण 32 पट सबस्क्राइब झाला होता. ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 14.95 पट सबस्क्राइब झाला होता. तर पात्र गुंतवणुकदार संस्थांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 42.92 पट सबस्क्राइब झाला होता. गैर संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 64.08 पट सबस्क्राइब झाला होता. ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून 66 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहे. ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनीने एका IPO लॉट मध्ये 428 शेअर्स जारी केले आहे. तर किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉटसाठी गुंतवणूक करू शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.