26 April 2024 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Sundaram Clayton Share Price | या कंपनीने फ्री बोनस शेअर वाटपाची घोषणा केली, बोनस शेअरचे प्रमाण पाहून गुंतवणूकीचा विचार करा

Sundaram Clayton Share Price

Sundaram Clayton Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘टीव्हीएस ग्रुप’ चा भाग असलेल्या ‘सुंदरम क्लेटन’ कंपनीच्या शेअर्सला जबर दणका बसला आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी ‘सुंदरम क्लेटन’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 20 टक्के लोअर सर्किटसह घसरून 3,853.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सुंदरम क्लेटन’ कंपनीचे शेअर 4823.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्स 20 टक्के घसरले होते. ‘सुंदरम क्लेटन’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारी स्कीम ऑफ अरेंजमेंटच्या एक्स डेटवर ट्रेड करत होते. ही कंपनी ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह क्षेत्रांना अॅल्युमिनियम डाय कास्टिंगचे पुरवठा करण्याचे काम करते. ही कंपनी सध्या आपल्या व्यवसायाची पुनर्रचना आणि डिमर्जिंग प्रक्रियेत गुंतलेली आहे. त्यामुळे शेअरच्या किमतीवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. (Sundaram Clayton Limited)

1 : 116 च्या प्रमाणात बोनस शेअर्स : 24 मार्च 2023 हा दिवस ‘सुंदरम क्लेटन’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर म्हणून ‘नॉन कॅन्व्हर्टेबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स’ म्हणजेच NCRPS वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून घोषणा केली होती. रेकॉर्ड तारीखवर कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 116 या प्रमाणात बोनस नॉन कन्व्हर्टेबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स जारी करणार आहे. कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये कळवले आहे की, ‘कंपनीने प्रत्येक इक्विटी शेअर धारकाला 10 रुपये दर्शनी मूल्याचे 116 फुल्ली पेड नॉन कन्व्हर्टेबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स जारी केले आहे.

‘सुंदरम क्लेटन’ कंपनीच्या संचालक मंडळाने 9 फेब्रुवारी 2022 रोजी पार पडलेल्या बैठकीत बोनस शेअर म्हणून नॉन कन्व्हर्टेबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या डिमर्जरसाठी मान्यता घेतली. NCLT ने 6 मार्च 2022 रोजी कंपनीची संमिश्र योजना मंजूर केली. आता ‘सुंदरम क्लेटन’ आणि तिच्या उपकंपन्यांचा अॅल्युमिनियम डी कास्टिंग व्यवसाय म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स ‘सुंदरम क्लेटन डीसीडी लिमिटेड’ पासून वेगळा केला जाणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्सच्या डिमर्जरची संपूर्ण प्रक्रिया जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याची योजना कंपनीने आखली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sundaram Clayton Share Price BSE 520056 on 25 March 2023.

हॅशटॅग्स

Sundaram Clayton Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x