15 December 2024 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

Kotyark Share Price | बायोडिझेल कंपन्यांना उज्वल भविष्य, शेअर बाजारातील एकमेव कोट्यार्क इंडस्ट्रीज शेअर तेजीत वाढतोय

Kotyark Share Price

Kotyark Share Price | कोट्यार्क इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 11.40 टक्क्यांच्या वाढीसह 794 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. कोट्यार्क इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील आठवड्यात शुक्रवारी अवघ्या एका दिवसात 81 रुपये वाढ नोंदवली होती.

29 सप्टेंबर 2023 रोजी कोट्यार्क इंडस्ट्रीज स्टॉक 672 रुपये या किंमत पातळीवरून 18 टक्के वाढला आहे. आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी कोट्यार्क इंडस्ट्रीज स्टॉक 0.96 घसरणीसह 790.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील एका महिन्यात कोट्यार्क इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 38 टक्के परतावा कमावून दिला होता. तर मागील सहा महिन्यांत कोट्यार्क इंडस्ट्रीज स्टॉक 82 टक्के मजबूत झाला आहे. कोट्यार्क इंडस्ट्रीज ही कंपनी भारतातील एकमेव बायोडिझेल कंपनी आहे, जी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली आहे.

कोट्यार्क इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, कोट्यार्क इंडस्ट्रीज कंपनीला आणि यमुना बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला बायोडिझेल उत्पादनासाठी एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या दोन्ही कंपन्यांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांनी 539 कोटी रुपये मूल्याचे 66234 किलो लिटर बायोडिझेल खरेदी करण्याचे कंत्राट दिले आहे.

या करारांतर्गत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनी 42155 किलो लिटर बायोडिझेल खरेदी करेल. तर एचपीसीएल कंपनी 7577 किलो लिटर बायोडिझेल खरेदी करेल. आणि भारत पेट्रोलियम 16502 किलो लिटर बायोडिझेल खरेदी करणार आहे.

नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने नुकताच ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रोलायझर उत्पादन वाढावे म्हणून प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. कोट्यार्क इंडस्ट्रीज आणि या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना भारत सरकारच्या या नवीन धोरणांचा फायदा होऊ शकतो. भारत सरकारने या योजनेअंतर्गत 17,490 कोटी रुपये प्रोत्साहनपर निधी वाटप केला आहे.

ग्रीन हायड्रोजनसाठी देखील भारत सरकारने 13050 कोटी रुपये प्रोत्साहनपर निधी जाहीर केला आहे. इलेक्ट्रोलायझरसाठी सरकारने 4440 कोटी रुपये प्रोत्साहनपर निधी जाहीर केला आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत अर्थसंकल्पात केंद्र सरकार हे प्रोत्साहनपर निधी देणार आहे. ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रोलायझर व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांना पुढील 5 वर्ष प्रोत्साहनपर रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे.

कोट्यार्क इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची स्थापना 2016 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः बायोडिझेल आणि त्याच्या उप-उत्पादनांच्या निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. राजस्थान स्थित कोट्यार्क इंडस्ट्रीज ही कंपनी बायोफ्युएल व्यवसायात आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते.

कोट्यार्क कंपनी हरित ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा शाश्वत विकास या संबंधित कामात देखील अग्रेसर आहे. ही कंपनी पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाद्वारे जैवइंधनाचे उत्पादन करते. या कंपनीचे राजस्थान राज्यात सिरोही जिल्ह्यात जे उत्पादन केंद्र सुरू आहे, त्यात कंपनी दररोज 500 किलोलिटर बायोडिझेलचे उत्पादन घेते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kotyark Share Price today on 10 October 2023.

हॅशटॅग्स

Kotyark Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x