
Ujjivan Small Finance Bank Share | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये घसरणीसह ट्रेड करत होते. गुरुवारी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 2 टक्के घसरून 54.51 रुपये किमतीवर पोहोचले होते. नुकताच या बँकेने आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले, आणि शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक स्टॉक सध्या 200-दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर आणि 5-दिवस, 20-दिवस, 50-दिवस आणि 100-दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या खाली ट्रेड करत आहे.
मागील चार ट्रेडिंग सेशनपासून या बँकेचे शेअर्स सतत घसरत होते. चार दिवसांत या बँकेच्या शेअर्समध्ये 7 टक्के घसरण पहायला मिळाली होती. गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 0.63 टक्के घसरणीसह 55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे डिसेंबर 2023 तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा निराशाजनक आले आहेत.
या बँकेचा PAT तिमाही आधारावर फक्त 3,001 दशलक्ष रुपये नोंदवला गेला आहे. जो वार्षिक आधारावर फक्त 2.3 टक्के वाढला आहे. मात्र तिमाही आधारावर 8.4 टक्के घसरला आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा NII 8.6 अब्ज रुपये नोंदवला गेला आहे, जो वार्षिक आधारे 23 टक्के वाढला आहे. आणि तिमाही-दर-तिमाही आधारे 4.4 टक्क्यांनी वाढला आहे.
ब्रोकरेज फर्मच्या मते, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने NII आघाडीवर जबरदस्त कामगिरी केली, मात्र उच्च OPEX मुळे डिसेंबर तिमाहीत थोडी कमजोर कामगिरी झाली. ब्रोकरेज फर्म सेंट्रम ब्रोकिंगने उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा FY 2024-25 मधील कमाईच्या अंदाजात किंचित सुधारणा होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स पुढील काळात 64 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
नुकताच उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स S&P BSE 500 इंडेक्समध्ये सामील झाले आहेत. मागील 6 महिन्यांत या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 98 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील दोन वर्षांत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 187 टक्के परतावा कमावला आहे. या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 62.99 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 22.45 रुपये होती. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे एकूण बाजार भांडवल 10684.72 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.