
Ujjivan Small Finance Bank Share Price | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक स्टॉक 65 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक स्टॉक 2.53 टक्के वाढीसह 44.53 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक कंपनी अंश )
मागील पाच दिवसांत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सची किंमत 3 टक्के घसरली आहे. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअर्सची किंमत 12 टक्के घसरली होती. मागील सहा महिन्यांत या बँकेच्या शेअरची किंमत 25 टक्के घसरली आहे. YTD आधारे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक स्टॉक 23 टक्के घसरला होता.
मागील एका वर्षात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्सची किंमत फक्त 1 टक्के वाढली होती. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 62.99 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 40 रुपये होती. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 8,400.58 कोटी रुपये आहे.
30 जून 2024 पर्यंत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या प्रवर्तकांनी बँकेचे एकूण 73.52 टक्के भाग भांडवल धारण केले होते. FII ने या बँकेचे 24.68 टक्के आणि DII ने 7.33 टक्के भागभांडवल धारण केले होते. मार्च तिमाहीत या बँकेचे एकूण महसूल उत्पन्न 1764.64 कोटी रुपये होते. तर मागील तिमाहीत या बँकेचे उत्पन्न 1655.39 कोटीच्या तुलनेत 6.60 टक्के वाढले आहे. मार्च 2024 तिमाहीत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने 329.63 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.