
UY Fincorp Share Price | यूवाय फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स मंदीच्या काळात देखील तेजीत ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.60 टक्के वाढीसह 25.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 480 कोटी रुपये आहे. यूवाय फिनकॉर्प कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 26.23 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 25.11 रुपये होती.
मागील 6 महिन्यांत यूवाय फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी यूवाय फिनकॉर्प स्टॉक 3.67 टक्के वाढीसह 25.98 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील एका वर्षात यूवाय फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात यूवाय फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मे 2020 रोजी यूवाय फिनकॉर्प स्टॉक 1.46 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 1400 टक्के वाढला आहे.
यूवाय फिनकॉर्प कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 103 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील तिमाहीत कंपनीने 14.02 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. याकाळात कंपनीच्या महसुलात एकूण 410 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीने 51.17 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
यूवाय फिनकॉर्प कंपनी 7 ऑक्टोबर 1993 साली पश्चिम बंगाल राज्यात रजिस्टर झाली होती. यूवाय फिनकॉर्प ही कंपनी मुख्यतः कॉर्पोरेट कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि सिक्युरिटीज गुंतवणूक संबंधित व्यवसाय करते. यूवाय फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 450 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
कंपनीने घोषणा केली आहे की, यूवाय फिनकॉर्प कंपनी ANS डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडमधील 32 लाख इक्विटी शेअर्स विकणार आहे. कंपनीने यासाठी गोल्डन गोयंका क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत शेअर खरेदी करार संपन्न केला आहे. ही खरेदी 25 रुपये प्रति शेअर या किमतीवर केली जाणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.