V Mart Retail Share Price | वी मार्ट रिटेल कंपनीचे शेअर्स अचानक तेजीत, गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देणाऱ्या शेअर्समधील तेजीचे कारण काय?

V Mart Retail Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वी मार्ट रिटेल कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वी मार्ट रिटेल कंपनीचे शेअरची 2100 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर हा स्टॉक 6.09 टक्क्यांच्या वाढीसह 2,101.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार वी मार्ट रिटेल कंपनीचे 116 कोटी किमतीचे 5.8 लाख शेअर्स म्हणजेच जवळपास 3 टक्के इक्विटी भाग भांडवल 1,990 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.16 टक्के वाढीसह 2,145.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मार्च 2023 तिमाही निकाल
वी मार्ट रिटेल या फॅशन रिटेलर कंपनीला मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत 36.96 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत वी मार्ट रिटेल कंपनीला 2.61 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या तीन महिन्यांच्या कालावधीत वी मार्ट रिटेल कंपनीने 19.97 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तथापि, FY23 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री मार्च 2022 च्या तुलनेत 458.78 कोटी वरून 29.46 टक्के वाढून 593.91 कोटी रुपयेवर पोहचली आहे.
कंपनीची कामगिरी
मार्च 2023 तिमाहीत वी मार्ट रिटेल कंपनीने 17 नवीन आउटलेट सुरू केले आहेत. तर त्याच तीन महिन्यांच्या कालावधीत कंपनीने 8 दुकाने बंद देखील केले आहेत. नवीन सुरू केलेल्या 17 नवीन स्टोअरपैकी पाच उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यानंतर आसाम, तेलंगणा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन स्टोअर सुरू करण्यात आले आहेत.
गुजरात, केरळ, ओडिशा आणि मध्य प्रदेशमध्ये कंपनीने प्रत्येकी एक दुकान सुरू केले आहे. चौथ्या तिमाहीत बंद झालेल्या आठ दुकानांपैकी दोन उत्तर प्रदेशमध्ये होते. आणि बिहार, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, मणिपूरमधील प्रत्येकी एक दुकान कंपनीने बंद केले आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या एकूण स्टोअरची संख्या 423 होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | V Mart Retail Share Price today on 15 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL