
Vasa Denticity Share Price | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 23 मे 2023 रोजी ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार 25 मे 2023 पर्यंत IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 121 ते 128 रुपये निश्चित केली आहे.
वसा डेंटिसिटी लिमिटेड GMP :
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, शनिवारी वसा डेंटिसिटी लिमिटेड कंपनीचे IPO शेअर्स 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. जर हा ट्रेण्ड असाच सुरू राहील तर, स्टॉक लिस्टिंग होईपर्यंत ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनीच्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 40 रुपये परतावा मिळू शकतो. ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 168 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
वसा डेंटिसिटी लिमिटेड IPO तपशील :
वसा डेंटिसिटी लिमिटेड कंपनी आपल्या IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 1000 शेअर्स जारी करणार आहे. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदाराला एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1.28 लाख रुपये जमा करावे लागणार आहे.
‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनी आपल्या आयपीओद्वारे 54.07 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनी 30 मे 2023 पर्यंत गुंतवणूकदारांना शेअर्स वाटप करेल. आणि स्टॉक 2 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहेत.
या आयपीओसाठी अर्ज कसा करावा? – How to Apply the Vasa Denticity IPO?
आपण आपल्या बँक खात्याद्वारे ऑनलाइन ASBA द्वारे वासा आयपीओ लागू करू शकता. आपण आपल्या स्टॉक ब्रोकर्सद्वारे यूपीआयद्वारे एएसबीएसाठी ऑनलाइन अर्ज देखील करू शकता. ऑफलाइन फॉर्म भरून तुम्ही तुमच्या स्टॉक ब्रोकर्समार्फतही अर्ज करू शकता.
आयपीओ बद्दल – What is Vasa Denticity IPO?
वासा डेंटिसिटी आयपीओ हा एनएसई एसएमई आयपीओ आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून ५४.०७ कोटी रुपये उभे करणार आहेत. इश्यूची किंमत १२१ ते १२८ रुपये प्रति शेअर आहे. हा आयपीओ एनएसईवर लिस्ट होणार आहे.
आयपीओचा उद्देश – What is the objective of the Vasa Denticity IPO?
आयपीओतून मिळणारी निव्वळ रक्कम खालील उद्दिष्टांच्या निधीसाठी वापरण्याचा कंपनीचा मानस आहे:
1. भांडवली खर्चाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी
2. ब्रँडची जागरूकता वाढविण्यासाठी खर्च
3. सामान्य कॉर्पोरेट उद्देश
4. ऑफर खर्चाची पूर्तता करणे