 
						Veerkrupa Jewellers Share Price | ‘वीरकृपा ज्वेलर्स’ या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 82.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के घसरणीसह 78.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 6 महिन्यांत वीरकृपा ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 24.74 टक्के मजबूत झाले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या 1,68,000 शेअर्सची 77.14 रुपये किमतीवर बल्कमध्ये विक्री झाली होती. 22000 शेअर्सची 76.96 रुपये किमतीवर बल्कमध्ये खरेदी झाली आहे.
10 महिन्यांत मजबूत वाढ :
वीरकृपा ज्वेलर्स कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 27 रुपये होती. या कंपनीचा IPO 29 जून 2022 ते 8 जुलै 2022 रोजी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. वीरकृपा ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 18 जुलै 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. 18 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 25.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. वीरकृपा ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 9 मे 2023 रोजी 82.20 रुपये किमतीवर बंद क्लोज झाले होते. मागील 10 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 221 टक्के परतावा कमावून दिला आहे.
वीरकृपा ज्वेलर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 3 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. या कंपनीने 16 मे 2023 हा दिवस बोनस शेअर्ससाठी एक्स डेट म्हणून जाहीर केला आहे.
याव्यतिरिक्त वीरकृपा ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजित करणार आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 146 रुपये होती. तर नीचांकी पातळी किंमत 24.40 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		