
Virtuoso Optoelectronics Share Price | ‘व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स’ या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. या एसएमई कंपनीचे शेअर्स मंगळवारीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के अप्पर सर्किटवर 186 रुपये किमतीला ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सने 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. शेअर बाजारातील ‘बिग व्हेल’ म्हणून ओळखले जाणारे आशिष कचोलिया यांनी कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Virtuoso Optoelectronics Share Price | Virtuoso Optoelectronics Stock Price | BSE 543597)
प्रेफरेंशियल शेअर्स जारी करण्यास मान्यता :
व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 142.50 रुपये प्रति शेअर या किमतीवर 2.46 दशलक्ष प्रेफरेंशियल शेअर्स काही नॉन प्रमोटर व्यक्तींना वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आशिष कचोलिया आणि बंगाल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रत्येकी 1.23 दशलक्ष म्हणजेच इक्विटी पोस्ट वाटपाच्या 5.38 टक्के जारी करण्यास मंजुरी दिली आहे. 15 सप्टेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई निर्देशांकावर सूचीबद्ध करण्यात आले. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 0.96 घसरणीसह 165.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
शेअरची कामगिरी :
व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स मागील 3 आठवड्यात जबरदस्त तेजीत ट्रेड करत होते. 10 जानेवारी 2023 रोजी हा कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 126 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 31 जानेवारी 2023 रोजी या SME कंपनीचे शेअर्स 173.50 रुपयांवर क्लोज झाले होते. व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 186 रुपये होती. तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 110.20 रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल 356 कोटी रुपये आहे. सप्टेंबर 2022 या तिमाहीमधे कंपनीने 11.52 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यातून कंपनीला 5.04 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.