Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, शेअर्स तेजीत येणार
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ख्याती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19.59 लाख कोटीवर पोहचले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते.
सोमवारी हा स्टॉक 6.86 टक्क्यांच्या वाढीसह 2,896.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होता. दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 7.18 टक्क्यांच्या वाढीसह 2,905 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मात्र या स्टॉकमध्ये थोडी नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के घसरणीसह 2,856.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE वर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या 8.24 लाख शेअर्सची ट्रेडिंग झाली होती. आणि NSE वर 1.19 कोटी पेक्षा जास्त शेअर्सची ट्रेडिंग झाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे बाजार भांडवल 19,59,444.03 कोटी रुपयेवर पोहचले होते. या कंपनीचे बाजारमूल्य एकाच दिवसात तब्बल 1,25,591.68 कोटी रुपयेने वाढले आहे.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 9 टक्के वाढले होते. तर आणि नोव्हेंबर महिन्यात शेअरची किंमत 4 टक्के वाढली होती. आणि आता जानेवारी 2024 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 11 टक्के वाढली आहे. कालच्या व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकने सप्टेंबर 2020 नंतरची सर्वात मोठी एकदिवसीय वाढ नोंदवली होती.
रिलायन्स कंपनीच्या शेअर्सने 2015 पासून आतापर्यंत दरवर्षी आपल्या गुंतवणुकदारांना सकारात्मक परतावा कमावून देण्याचा विक्रम सुरक्षित ठेवला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये साध्य केलेल्या वाढीमुळे 2023 या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना 11.5 टक्के परतावा कमावून देऊ शकले. या कंपनीच्या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स सध्या 68 वर आहे. म्हणजेच स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाहीये.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Share Price NSE Live 30 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News