
Waaree Renewables Share Price | वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीच्या शेअर्सने 5 टक्के अप्पर सर्किट हीट केला होता. ( वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
मागील आठवड्यात वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स सातत्याने अनेक दिवस अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आता या कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी स्टॉक 5 टक्के वाढीसह 2,624.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
5 एप्रिल 2024 रोजी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये 39 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 1 महिन्यात वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 850 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1250 टक्के मजबूत झाली आहे.
एका वर्षापूर्वी वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 183 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 2600 रुपये किमतीच्या पार गेला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मुल्य असलेले शेअर्स 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 5 शेअर्समध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने 16 मे 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.