
Yes Bank Share Price | YES Bank शेअर्समध्ये मागील एका महिन्यात कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी 8 डिसेंबर 2022 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत Yes Bank च्या शेअरची किंमत 35 टक्क्यांनी वधारली आहे. Yes Bank शेअर्समध्ये ही तेजी असताना कंपनीने आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. Yes बँकने आपले 48,000 कोटी रुपयांचे थकीत कर्ज जेसी फ्लॉवर्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला हस्तांतरित केले आहे.
Yes बँकेने शनिवारी स्टॉक मार्केट नियामक सेबीला सूचित केले की, जेसी फ्लॉवर्सला स्ट्रेस डेट म्हणून चिन्हांकित 48,000 कोटी रुपयांचा कर्ज पोर्टफोलिओ हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या दरम्यान 1 एप्रिल 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत थकीत असलेल्या कर्ज वसुलीचेही समायोजन पूर्ण करण्यात आले आहे.
येस बँकेने आपले थकीत कर्जे ज्यांना स्ट्रेस डेट असे म्हणतात, ते जेसी फ्लॉवर्स एआरसी कंपनीला सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे घोषित केले होते. अशाप्रकारे Yes बँकेने आपल्या पोर्टफोलिओमधील बुडीत आणि थकीत कर्जाचा आकार कमी करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. काही वर्षांपूर्वी बुडीत आणि थकीत कर्जाचे प्रमाण वाढल्यामुळे Yes बँकेची आर्थिक स्थिती फार खराब झाली होती, परंतु बँकेने आपले कर्ज पोर्टफोलिओ स्वच्छ करण्यासाठी विविध निर्णय घेतले आहेत, आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपण बँकेच्या स्टॉकवर पाहू शकतो.
6 महिन्यात 70% पर्यंत परतावा
खासगी क्षेत्रातील येस बँकेने कमी कालावधीत गुंतवणूकदारांना अधिक परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत बँकेने ७०.६८ टक्के, तर जानेवारीपासून येस बँकेने ५० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात बँकेने 25.22 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत. तसेच, तीन दिवसांत त्याचे शेअर्स ३५ टक्क्यांपर्यंत होते. शुक्रवारी येस बँकेचे समभाग 21.10 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत होते, जे आधीच्या बंदच्या तुलनेत 6.01 टक्क्यांनी कमी होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.