
Yes Bank Share Price | येस बँक या खासगी क्षेत्रातील बँकेच्या शेअरची किंमत मागील 10 महिन्यांतील उच्चांक किमतीवर पोहचली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 3.12 टक्क्यांच्या वाढीसह 20.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 21.15 रुपये या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचला होता.
सध्या येस बँक स्टॉक फेब्रुवारी 2023 नंतरच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 2.48 टक्के वाढीसह 20.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील काळात येस बँकेचे शेअर्स 40 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. येस बँकेची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत येस बँकेने मजबूत नफा कमावला आहे. यापूर्वी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देखील येस बँकेने मजबूत नफा कमावला होता.
आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते पुढील आठवड्यात येस बँकेचे शेअर 22 रुपये ते 24 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकमध्ये 17 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक पुढील काळात 25 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील सहा महिन्यात येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.