
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात बक्कळ कमाई करून देऊ शकतो. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक मजबूत ब्रेकआऊट देण्याच्या तयारीत आहे. हा स्टॉक पुढील काळात 35-40 रुपयेपर्यंत जाऊ शकतो. ( येस बँक अंश )
येस बँक स्टॉक दीर्घकाळ 5 ते 20 रुपये या ट्रेडिंग रेंजमध्ये अडकला होता. त्यांनतर शेअरने 20-21 रुपये किमतीवर मजबूत ब्रेकआउट दिला. आणि आता हा स्टॉक 25 रुपये किमतीच्या पार गेला आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.26 टक्के घसरणीसह 26.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
तज्ञांनी येस बँक स्टॉक किमान 12 महिन्यांसाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक मजबूत ब्रेकआऊटसह 35-40 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी 20 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी येस शेअरमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली होती. दिवसाअखेर हा स्टॉक 11.36 टक्क्यांच्या वाढीसह 26.67 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील एका वर्षभरात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारी येस बँकेचे 51 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. मीडिया रेपोर्टनुसार SBI पुढील काळात येस बँकेतील आपले भागभांडवल बँक ऑफ जपानला विकण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.