
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील काळात येस बँकेचे शेअर्स 32 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. येस बँकेने शनिवारी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या घोषणेनंतर सोमवारी येस बँकेचे शेअर्स तेजीत आले होते. ( येस बँक अंश )
सोमवारी येस बँकेचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 28.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.40 टक्के घसरणीसह 26.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील एका महिन्यात येस बँकेचे शेअर्स 13 टक्के मजबूत झाले होते. तर मागील सहा महिन्यांत या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 73 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात येस बँकेचे शेअर्स 22 टक्के मजबूत झाले आहेत.
सध्याची शेअर्सची कामगिरी पाहता तज्ञांनी येस बँकेच्या शेअरमधे गुंतवणूक करताना 24 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स अल्पावधीत 30 रुपये आणि नंतर 32 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी किंमत 32.85 रुपये आहे.
चॉइस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँकेच्या शेअर्समध्ये 24 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, येस बँकेच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. मार्च 2024 तिमाहीमध्ये येस बँकेने 451 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेने 202 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर येस बँकेच्या नफ्यात 123 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. येस बँकेचा सकल NPA 1.7 टक्के नोंदवला गेला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 2.2 टक्के होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.