 
						Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीबाबत सकारात्मक बातमी आली आहे. या कंपनीने गोवा राज्य सरकारसोबत एक करार केल्याची माहिती दिली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत होते.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 0.073 टक्के वाढीसह 756 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
झेन टेक्नॉलॉजी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, नवीन संशोधन, विकास आणि उत्पादन केंद्र उभारण्यासाठी झेन टेक्नॉलॉजी कंपनीने गोवा राज्य सरकारसोबत एक करार संपन्न केला आहे. झेन टेक्नॉलॉजी कंपनी गोव्यात सेटअप इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारणार आहे. यासाठी कंपनीने 50 कोटी रुपये प्रारंभिक गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
मागील सहा महिन्यात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील एका महिन्यात झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 12 टक्क्यांनी वाढला आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 100 टक्क्यांनी वाढले आहे.
मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 291 टक्के परतावा कमावून दिला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 912.55 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 175.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6384 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		