12 December 2024 3:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Akshar Spintex Share Price | फक्त 7 रुपयाचा पेनी शेअर! अल्पावधीत देतोय मजबूत परतावा, वेळीच एंट्री घेणार का?

Akshar Spintex Share Price

Akshar Spintex Share Price | मागील काही दिवसांपासून अक्षर स्पिंटेक्स कंपनीच्या शेअर्सची किंमत जबरदस्त तेजीत वाढत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अक्षर स्पिन्टेक्स स्टॉक 4.48 टक्क्यांच्या वाढीसह 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अक्षर स्पिन्टेक्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 8.50 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 4.58 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 175 कोटी रुपये आहे.

मागील 5 दिवसांत अक्षर स्पिन्टेक्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 जानेवारी 2023 या कंपनीचे शेअर्स 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 40 टक्क्यांमी वाढला आहे. आज गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी अक्षर स्पिन्टेक्स स्टॉक 2.04 टक्के वाढीसह 7.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

नुकताच अक्षर स्पिन्टेक्स कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीला 1.71 अब्ज रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरमुळे अक्षर स्पिन्टेक्स कंपनीला महसूल वाढवण्यास मदत होणार आहे, सोबत आपल्या जागतिक ग्राहकांना उच्च दर्जाचे सूत पुरवठा करून भविष्यात चांगल्या ऑर्डर मिळण्याची देखील शक्यता वाढणार आहे. अक्षर स्पिन्टेक्स कंपनीने आपले कर्ज 8 कोटी रुपये कमी केले आहे. पुढील काळात कंपनीच्या व्यवसायात आणि नफ्यात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.

अक्षर स्पिन्टेक्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत कमाई करून देऊ शकतात. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते अक्षर स्पिन्टेक्स कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 9 रुपये ते 12 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी या स्टॉकवर गुंतवणूक करताना 5 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

अक्षर स्पिन्टेक्स ही कंपनी मुख्यतः कापड उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना 2013 साली जामनगर, गुजरात राज्यात झाली होती. ही कंपनी मुख्यतः कापूस धागा तयार करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Akshar Spintex Share Price BSE 23 November 2023.

हॅशटॅग्स

Akshar Spintex Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x