1 February 2023 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Union Budget 2023 | पोस्ट ऑफिसच्या दोन योजनांमध्ये गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट, कोणत्या योजना पहा New Tax Regime Changes | टॅक्स पेयर्स लक्ष द्या, अन्यथा या एका चुकीमुळे तुम्हाला 7 लाखांपर्यंत सूट मिळणार नाही Budget 2023 Income Tax | नोकरदारांसाठी मोठी बातमी! अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये इतकी सूट दिल्याची घोषणा Union Budget 2023 | खुशखबर, महिलांना मिळणार 2 लाखांचा फायदा, अर्थमंत्र्यांनी केली घोषणा LIC Whatsapp Services | खुशखबर! LIC संबंधित या सर्व सेवा आता व्हाट्सअँपवर ऑनलाईन मिळणार, असे कनेक्ट व्हा TCS Share Price | अर्थसंकल्पाच्या दिवशी तज्ज्ञांचा टीसीएस शेअर खरेदीचा सल्ला, मोठा परतावा देईल, कारण पहा Nykaa Share Price | नायका शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा
x

MPSC'च्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा केंद्र बदलता येणार | महत्वाचा निर्णय

MPSC Board, UPSC Board, Railway Recruitment Board, Police Bharti

मुंबई, 15 ऑगस्ट : एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला पार पडणार होती. मात्र राज्यासह देशभरात त्याच दिवशी म्हणजे १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. ही परीक्षा आता २० सप्टेंबरला होणार असल्याची माहिती एमपीएससीने पत्रकाद्वारे दिली होती.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक१७ जून रोजी जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार होत्या. मात्र, १३ सप्टेंबर रोजी देशभरात नीट परीक्षा होणार असून त्याच दिवशी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार होती. त्यामुळे एमपीएससीने पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र अजुनही वाहतूक व्यवस्था पूर्ववत झालेली नाही त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचणार कसे असा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. मात्र आता आयोगाने विद्यांसाठी नवी सुविधा दिली असून त्यांना आपलं जवळचं परीक्षा केंद्र निवडता येणार आहे.

आहे. कोरोनाच्या साथीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नंतर 13 सप्टेंबर ही तारीख दिली होती मात्र त्याच दिवशी देशव्यापी NEETची परीक्षा होणार असल्याने आयोगाने ही नवी तारीख जाहीर केली होती. ज्या मुलांनी मुंबई, पुणे केंद्र घेतलं असेल त्यांना याचा फायदा होणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थी त्यांना जवळचं परीक्षा केंद्र घेऊ शकतील.

 

News English Summary: The pre-service examination of MPSC was to be held on September 13. However, the MPSC decided to postpone the state service examination as it would be held on the same day, September 13, across the country. The MPSC had informed in a letter that the examination would now be held on September 20.

News English Title: MPSC students should change the examination center says commission new News latest Updates.

हॅशटॅग्स

#MPSC(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x