
Gold Rate Today | सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त झालं आहे. जर तुमचाही सोनं खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर ही योग्य वेळ आहे. सराफा बाजारात सातत्याने होत असलेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. आज सोन्याचा भाव 58300 रुपयांच्या खाली घसरला आहे. चला तर मग पाहूया आज सोनं किती स्वस्त झालंय. (Gold Price Today)
आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 58345 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 58471 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १२६ रुपयांनी घसरला आहे. सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 3,240 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाला आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.
काय आहे 22 कॅरेट सोन्याचा भाव?
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,100 रुपये तर दिल्लीत सोन्याचा भाव वाढून 54,750 रुपये आणि बंगळुरूमध्ये 54,100 रुपये झाला आहे.
सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता
सराफा बाजारसबंधित वेबसाइटनुसार, तज्ज्ञांनी सांगितले आहे की, सोन्या-चांदीत घसरण होईल. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 1000 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली होती. जुलै महिन्यात सोन्याचा भाव 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात सातत्याने सोनं स्वस्त होत आहे.
एमसीएक्सवर सोनं स्वस्त आहे
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याचा भाव 0.14 टक्क्यांनी घसरून 58,292 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव 58,375 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. याशिवाय चांदीचा भाव 0.18 टक्क्यांनी वाढून 70364 रुपये प्रति किलो झाला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.