
Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत आहेत. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड चढ-उतार होत आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 61,700 रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचलेल्या सोन्यात मागील दिवसांमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. (Gold Price Today)
त्याचप्रमाणे चांदीचा भावही ७७ हजारांच्या पुढे गेला आहे. त्यानंतर चांदी 68 हजाररुपयांवर गेली, पण आता चांदी पुन्हा 75 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या आठवड्यातील शेवटच्या दिवशी तेजीने बंद झालेल्या सराफा बाजारात आज संमिश्र कल दिसून आला आहे.
एमसीएक्सवर सोनं-चांदीचे भाव घसरले :
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. रविवारी सोने 160 रुपयांनी घसरून 59156 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 268 रुपयांनी घसरून 75700 रुपये प्रति किलोझाली. याआधी शनिवारी एमसीएक्सवर सोने 59316 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 75968 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती.
आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती
सराफा बाजारच्या संकेतस्थळाच्या https://ibjarates.com दररोज ताजे दर जाहीर केले जातात. वेबसाइटने रविवारी जारी केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,265 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे चांदी 75,115 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. याआधी शनिवारी सोने 59338 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74979 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती.
तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे नवे दर :
* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : 60000 रुपये
* भिवंडी, २२ कॅरेट सोने : ५५०३० रुपये, २४ कॅरेट सोने : 60030 रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : 60000 रुपये
* लातूर, 22 कॅरेट सोने : 55030 रुपये, 24 कॅरेट सोने : 60030 रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 55000 रुपये, 24 कॅरेट सोने : 60000 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : 60000 रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५५०३० रुपये, २४ कॅरेट सोने : 60030 रुपये
* पुणे, २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : 60000 रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : 60000 रुपये
* ठाणे, २२ कॅरेट सोने : ५५००० रुपये, २४ कॅरेट सोने : 60000 रुपये
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.