20 January 2020 7:37 PM
अँप डाउनलोड

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आदरांजली; देश, राज्य, मुंबईकर तुमचे सदैव ऋणी राहतील

26 November 2008, Mumbai Police

मुंबई: २६ नोव्हेंबर २००८ हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या घटनेला आज ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास १६६ लोक मृत्यूमुखी पडले होते, तर ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.

Loading...

२६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलसोबतच इतर ६ ठिकाणांवर हल्ला केला होता. या हल्ल्याज जवळपास १६६ लोकांचा मृत्यू झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर ताज हॉटेलमध्ये ३१ लोकांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, सदर एअर स्ट्राईकनंतर स्वतःची पाठ थोपटवण्यात व्यस्त असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी २६/११ मधील मुंबईवरील दहशदवादी हल्ल्याचा आधार घेत विरोधकांनी काहीच केलं नसल्याचा आरोप केला आहे. वास्तविक मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात जेव्हा खुलेआम दहशदवादी हल्ला होतो, तेव्हा सामान्यांचा विचार करून कारवाई करणे किती कठीण होते याचा मोदींना अंदाज नसावा. त्यावेळी भारतीय नौदल वेस्टर्न कमांडचे कमांडो, एनएसजी कमांडो आणि मुंबई पोलिसांनी काय बलिदान दिलं होतं आणि दहशतवाद्यांना यमसदनी धाडून अजमल कसाबला मुंबई पोलीस कॉन्स्टेबल शहीद तुकाराम ओंबळे यांनी हातात कोणताही हत्यार नसताना त्याला जिवंत पकडून पाकिस्तानला उघडं पाडलं होतं.

तसेच मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत दहशतवादी अजमल कसाब याला कोणतीही वाच्यता न करता एका सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी दिली होती. विशेष म्हणजे भारताने कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि भारताच्या कायद्याचे उल्लंघन न करता त्याला फासावर लटकवले होते. तत्पूर्वी, दहशदवादी अजमल कसाबचा दयेचा अर्ज देखील त्यावेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी फेटाळला होता. कसाबला विशेष न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातर्फे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोक मारले गेले होते तर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एनएसजी कमांडो देशासाठी शहीद झाले होते. त्यामुळे त्या घटनाक्रमवार प्रश्न उपस्थित करून आणि स्वतःला मोठं दाखवण्यासाठी मोदी त्या शहिदांचा अपमान करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे.

एका बाजूला आज याच घटनेला आठवून आदरांजली वाहिली जातं असताना दुसऱ्या बाजूला एक दुर्दैवी घटना देखील पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीत स्थान देण्यात आले आहे. साध्वींची संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कमिटीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, आदी नेत्यांचा समावेश आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यापासून त्या चर्चेत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसेला देशभक्त संबोधने, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष नेत्यांवर जादू टोना केल्याचे वक्तव्य करणे, यासारखे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते.

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

NOTE: mahapariksha, mahaportal, maha portal, mahapolice, govnokri, govnokri, govnokari, mpscworld, mpsc world, majhi naukri, majhinaukri, mazi nokari, majhi nukari, mahampsc, mahaonline, mahanmk, mahadbt, mahadbt login, mahadbtmahait, mahadbtmahait, mahanews, maha news, nokari sandharbha, majhanews, Current Recruitment 2020, Latest Government Jobs, Latest Government Jobs In Maharashtra 2020, Government Recruitment, Jobs in Government Sectors, Bank Jobs, Online Application Form, Defence Job, Engineering Jobs, freshersworld, freshers world, maharashtra police, Police Bharti, drdo recruitment, ibps, government jobs, lic recruitment, fresherslive, driving licence test, general knowledge, rto exam, mscit, ms cit, mscit course, ms cit course, driving licence test, learning license test, driving license test, learning licence test, parivahan, rto exam in english, learning licence test questions, NIOS Bridge Course for B.Ed Teacher, Talathi Bharti

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(14)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या