30 April 2025 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

गोपीनथ मुंडे, न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करा - शिवसेना

Sushant Singh Rajput, CBI, Gopinath Munde, Justice Loya, ShivSena

मुंबई, ११ ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजप ज्या पद्धतीने सीबीआय चौकशीची मागणी करत आहे तशीच गोपीनाथ मुंडे आणि न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचीही करा, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आणले जात आहे. त्याबाबत आणि बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे याबाबत एका खासगी वृत्तवाहीणीच्या कार्यक्रमात सावंत बोलत होते.

या वेळी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, राज्य सरकारने मागणी केल्याशिवाय सीबीआय चौकशी करु शकत नाही. हे कायद्याचे राज्य आहे. एखाद्या प्रकरणात देशातील कोणत्याही राज्यात अथवा राज्यातील कोणत्याही गावात तक्रार दाखल झाली तर ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये ते प्रकरण वर्ग करतात. मात्र, घटनने घालून दिलेली मर्यादा आणि नियम याला डावलून बिहार पोलिसांनी आणि राज्य सरकारने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपासा सीबीआयकडे दिला आहे, असेही अरविंद सावंत या वेळी म्हणाले.

तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा बिहार पोलिसांचा काय संबंध आहे? मुंबई पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. बिहार सरकारच्या सांगण्यावरुन सीबीआयकडे तपास सोपवावा हे गरजेचे नाही. या प्रकारामुळे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण होत आहे. काही लोक सुशांत प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणीही उठावं आणि सीबीआय चौकशी लावावी असं झालं तर याला काही अर्थ नाही. देशाच्या संविधानालाच धक्का देणार का? अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपावर केली आहे.

 

News English Summary: Shiv Sena MP Arvind Sawant has said that the BJP should demand a CBI probe into the Sushant Singh Rajput suicide case as well as the deaths of Gopinath Munde and Justice Loya.

News English Title: Along with Sushant Singh Rajput CBI Should Investigate Gopinath Munde and Justice Loya Case Also said ShivSena News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या