कोणताही दहशतवादी अँगल नसताना आर्यन खान प्रकरण तपास NIA कडे देण्याची तयारी? | नेमका काय बनाव रचणार?

मुंबई, 30 ऑक्टोबर | तब्बल 28 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आर्यन खान अखेर घराच्या दिशेनं रवाना झाला. सकाळापासून सुरू असलेली जामीनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला. आर्यनला घेण्यासाठी शाहरुख खानचा बॉडीगार्ड ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर गाडी घेऊन हजर होता. बॉडीगार्डसोबत आर्यन खान घरी मन्नतकडे (Aryan Khan Case to NIA) रवाना झाला.
Aryan Khan Case to NIA. The Mumbai drug case is now likely to be handed over to the National Investigation Agency. This was reported by CNN News 18 quoting sources :
दरम्यान, केंद्राच्या अखत्यारीतील NCB अधिकारी समीर वानखेडे धक्कादायक वादाच्या भोवऱ्यात असून अनेक पुरावे समोर येण्यास सुरुवात झाल्यानंतर दिल्लीतील भाजप सरकार धास्तावलं आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस ऍक्शन मोडमध्ये येताच दिल्लीश्वरांचं टेन्शन वाढल्याचं वृत्त आहे. तसेच या प्रकरणात पंच थेट अधिकाऱ्यांवर आरोप करू लागले आहेत आणि दोन पंच थेट भाजपशी संबंधित असल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे हे बोगस प्रकरण भाजपने समीर वानखेडे यांच्यामार्फत उभं केल्याचा थेट आरोप विरोधात करत आहेत. परिणामी, दिल्लीतील भाजप वरिष्ठ काहीही करून हे प्रकरण स्वतःच्या राष्ट्रीय एजन्सीकडे घेण्याच्या तयारीत आहेत असं खात्रीलायक वृत्त आहे. विशेष म्हणजे याला इतर वाहिन्यांकडूनही दुजोरा मिळत आहे.
दिल्लीश्वरांकडून कांगावा केला जाऊ शकतो:
देशभरात गाजत असलेल्या मुंबई ड्रग प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविला जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त सीएनएन न्यूज१८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. वृत्तानुसार या प्रकरणाची लिंक आंतरराष्ट्रीय रॅकेटशी असल्याचा बनाव उभा केला जाऊ शकतो. या हायप्रोफाईल प्रकरणामध्ये एक मोठा कट आणि देशावरील संभाव्य धोका आहे असा कांगावा केला जाऊ शकतो आणि हा तपास एनआयएकडे देण्यात येऊ शकतो. तत्पूर्वी मुंबई ड्रग प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. विशेष म्हणजे गुजरातमध्ये हजारो किलोची हेरॉईन पकडूनही मोदी सरकारला त्याची लिंक आंतरराष्ट्रीय रॅकेटशी असल्याचं वाटलं नव्हतं हे विशेष.
सूत्रांनी सांगितले की, एनआयएची टीमने एनसीबीच्या विभागीय कार्यालयात सुमारे दोन तास माहिती घेतली. मुंबईत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ड्रगबाबत छापेमारी केली होती. मात्र या तपासावरून समीर वानखेडे यांना आरोपांचा सामना करावा लागत आहे. एक साक्षीदार प्रभाकर साईल याने वानखेडे यांच्यावर २५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, एनआयएकडे तपास सोपवण्याबाबतचे नोटिफिकेशन लवकरच निघू शकते.
पण, तपास एनआयएकडे सोपवण्यास एनसीबी आक्षेप घेऊ शकते. एनआयएचा हा हस्तक्षेप एनसीबीच्या अधिकारक्षेत्राला कमकुवत करू शकतो. तसेच भविष्यातील अन्य तपासामध्ये संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का देऊ शकतो. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासामध्ये सध्या त्यांना कुठलाही दहशतवादी अँगल मिळालेला नाही.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Aryan Khan Case to NIA reported by CNN News 18 quoting sources.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tips Films Share Price | मनी मेकर स्टॉक! झटपट पैसा वाढवणाऱ्या शेअरची कामगिरी पाहा, शेअरमध्ये रोज अप्पर सर्किट लागतोय
-
Fusion Micro Finance Share Price | कमाईची संधी! हा शेअर 50 टक्के परतावा देईल, दिग्गज ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
-
Emami Share Price | सौंदर्य प्रसाधन ब्रँड कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती बनवले, 1 लाखावर 4.69 कोटी परतावा, डिटेल्स पाहा
-
K&R Rail Engineering Share Price | गुंतवणुकदारांना अल्पावधीत श्रीमंत करणाऱ्या शेअरची माहिती पाहा, हा शेअर तेजीत वाढतोय
-
IndiaFirst Life Insurance IPO | सरकारी बँक! बँक ऑफ बडोदाची मालकी असलेल्या विमा कंपनी IPO लाँच करणार, डिटेल्स वाचून गुंतवणूक करा
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
Udayshivakumar Infra Share Price | हा IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये मजबूत वाढतोय, लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणुकदार होणार मालामाल
-
VST Tillers Tractors Share Price | शेअर बाजार कमजोर असताना हा स्टॉक तेजीत धावतोय, नेमकं कारण काय?
-
Venus Pipes and Tubes Share Price | गुंतवणुकीवर 40% परतावा हवा आहे का? 1 वर्षात 125% परतावा देणारा शेअर मालामाल करेल
-
Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा