13 May 2021 7:29 AM
अँप डाउनलोड

मोदी साहेबांवर किती वेळा घाणेरड्या भाषेत राष्ट्रवादी-काँग्रेसवाले बोलले आहेत- निलेश राणे

BJP leader Nilesh Rane, Gopichand Padalkar, Sharad Pawar

मुंबई, २४ जून : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसंच गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशाराही दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या शरद पवारांबद्दलच्या वादग्रस्त विधानावर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट करत गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले आहे.

निलेश राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अनेकवेळा घाणेरड्या भाषेत वक्तव्य केलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या त्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही. पण भाजपाच्या आमदाराच्या किंवा कार्यकर्त्याच्या कोणी अंगावर जाणार असेल तर जशास तसे उत्तर देऊ हे लक्षात ठेवा, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

 

News English Summary: Many political leaders have reacted to Gopichand Padalkar’s controversial statement about Sharad Pawar. Now BJP leader Nilesh Rane has also tweeted his opinion on Gopichand Padalkar’s statement.

News English Title: BJP leader Nilesh Rane has warned the NCP and the Congress over Gopichand Padalkar statement News latest Updates.

हॅशटॅग्स

#GopichandPadalkar(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x