2 May 2025 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

युती काळातील दुष्काळ | तेव्हा विदेशात खाऱ्या पाण्यावर मजा | आता अर्नबसाठी कदमांची पायपीट

BJP MLA Ram Kadam, Arnab Goswami

मुंबई, ९ नोव्हेंबर: Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. दरम्यान, मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी पोलिस आणि ठाकरे सरकारला दिले आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या जिवाला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर महाविकास आघाडी सरकार यासाठी जबाबदार राहिलं असं आमदार राम कदम यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. दरम्यान आज दुपारी ३ वाजता अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये फडणवीस सरकार असताना आणि राज्य दुष्काळात होरपळत असताना सत्ताधारी पक्षातील आमदार म्हणून ग्रामीण भागात जाण्याऐवजी हे आमदार राम कदम परदेशात थंडगार समुद्राच्या पाण्यावर पाहत पेय्य घेऊन आनंद लुटताना दिसले होते. त्याच दुष्काळाच्या काळात विरोधक देखील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर जाऊन दुष्काळाने होरपळलेल्या गावकरांना काही ना काही मदत करत होते.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपून तत्कालीन सत्ताधारी आमदार राम कदम कुटुंबासोबत सुट्टीची मजा घेत होते. कुटुंबासोबत सुट्टीवर जाणं गैर नसलं तरी, ते कधी याचं किमान जनतेने निवडून दिलेल्या सत्ताधाऱ्यांना तरी भान ठेवणं गरजेचं होतं. भर उन्हाळ्यात राज्यात ऐतिहासिक दुष्काळ पडलेला होता तेव्हा सत्ताधारी नेते मात्र स्वतःच्या उन्हाळी सुट्ट्या देशाबाहेर घालवून, पुन्हा पावसाळ्याचा आनंद लुटायला स्वगृही परतले होते. मात्र आज अर्णब गोस्वामीसाठी ते त्यांच्या पायाची प्रचंड झीज करताना दिसत आहेत.

स्वतःच्या मतदासंघात प्रवचनावेळी हेच आमदार राम कदम माणुसकीचे धडे देताना आजही दिसतात आणि मनुष्य प्राण्याच्या मदतीसाठी आपण कसं धावून गेलं पाहिजे याचं ब्रह्मण्यान सामान्य भक्तांना म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्यांना शिकवत असतात. दहीहंडी दरम्यान त्यांच्यातल्या महान आणि अध्यात्मात तल्लीन झालेल्या महापुरुषाचे रूप आणि विचार देशाने ऐकले आहेत. परंतु तेच तत्कालीन सत्ताधारी पक्षाचे सर्वज्ञानी आमदार राम कदम दुष्काळामुळे गोड्यापाण्यासाठी वणवण करणाऱ्या ग्रामीण भागातील मनुष्य प्राण्याला अधांतरी सोडून विदेशात खाऱ्या पाण्यावर तरंगून सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटताना दिसले होते.

 

News English Summary: The arrest of Republic TV editor Arnab Goswami has sparked allegations in the state’s ruling Mahavikas Alliance government and the main opposition Bharatiya Janata Party. The arrest of Arnab Goswami has drawn constant criticism from the Bharatiya Janata Party and the Shiv Vikas and Mahavikas Aghadi. Meanwhile, I am going to Taloja Jail to meet Arnab Goswami. BJP MLA Ram Kadam has challenged the police and the Thackeray government to show restraint if they have the courage.

News English Title: BJP MLA Ram Kadam fact during Yuti government news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RamKadam(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या