20 May 2022 9:33 AM
अँप डाउनलोड

२०२२ पर्यंत इंदू मिलमधील स्मारकाचं काम पूर्ण करणार: अजित पवार

Ajit Pawar, Indu Mill, Dr Babasaheb Ambedkar Memorial

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाच्या काही परवानग्या रखडल्या आहेत. या परवानग्यांचा केंद्राशी काहीही संबंध नसून राज्यस्तरावरील या परवानग्या आहेत. त्या लवकरच देण्यात येतील आणि येत्या दोन वर्षात म्हणजे १४ एप्रिल २०२२ पर्यंत या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी यावेळी सांगितलं की, “इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाविषयी आपण माहिती घेतली, स्मारकाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार असून या महिन्यात सर्व परवानग्या मिळवून देणार आहोत. सर्व अडचणी दूर करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

“सगळ्या परवानग्या मिळाल्या असून काही बाकी आहेत. राज्य सरकारच्या अख्त्यारित सर्व परवानग्या असल्याने त्या मिळण्यात अडचण येणार नाही,” असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच स्मारकाच्या कामात कोणतीही अडचण येणार नाही, त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करु असंही यावेळी ते म्हणाले.

 

Web Title:  Deputy CM Ajit Pawar Dadar Chaityabhoomi Indu Mill Dr Babasaheb Ambedkar Memorial.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(184)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x