13 December 2024 12:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

मुंबईकरांनो कोणी पदार्थ खाल्ले तिकडे? अन्न पुरवणाऱ्या 'त्या' महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

Corona Crisis, Covid 19, hawker Test positive

मुंबई, २६ मार्च : मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करत आहे. असं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांना शोधून त्यांची केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. चाचण्या करण्यासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे.देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ६०६ वर, प्रत्येकी पाचवा रुग्ण महाराष्ट्रातला. तत्पूर्वी याच भागात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात झालेला महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ४ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे आज पुन्हा दोन अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्चला या महिलेचा मृत्यू झाला होता. आज शवविच्छेदन अहवाल हाती आला असता हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समोर आलं. मृत महिला ही उपचारासाठी वाशीमधल्या २ खासगी रुग्णालयात गेली होती अशीही माहिती समोर येत आहे.

राज्यातील कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यातून दोन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने राज्याचा आकडा १२४ वर गेला आहे. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री बुधवारपासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्य सरकारनेही यापूर्वीच उपाययोजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे.

 

News English Summery: In Mumbai, reports have revealed that a hawker woman’s corona test is positive in Prabhadevi area. The woman is selling food at a corporate office in Prabhadevi area. This is reported by India Today. According to information received, it is said that all those who came in contact with the woman were being searched and carried out. He was taken to Kasturba Hospital for tests and his report is yet to come. The data is given by Mumbai Municipal Corporation. The number of coronary patients in the country is 606, the fifth in Maharashtra. Earlier, another corona patient was found in the same area. Therefore, there is an atmosphere of fear among the citizens.

 

News English Title:  Story corona Mumbai update hawker at Prabhadevi test positive for Covid 19 News Latest update.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x