9 August 2020 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अन्यथा सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकार बरखास्त होईल हे लक्षात ठेवा : आ. भातखळकर Corona Virus | आज राज्यात १२, ८२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २७५ रुग्णांचा मृत्यू अस्वच्छतेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘भारत छोडो’चा नारा मराठा आरक्षण | मेटे धादांत खोटे बोलत असून ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिशाभूल करत आहेत मराठा समन्वय समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा | मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध विजयदुर्ग किल्ल्याची पडझड | खा. नारायण राणे यांनी पाहणी केली | केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार किराणा दुकानांवरील कर्मचारी आणि फेरीवाल्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका अधिक - केंद्र सरकार
x

राष्ट्रपती राजवटीची धमकी हा जनादेशाचा अपमान: शिवसेना

BJP Sudhir Mungantiwar, MP Sanjay Raut, Saamana Newspaper, Shivsena, BJP Maharashtra

मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सुरू झालेला सत्तास्थापनेबाबतचा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या राष्ट्रपती राजवट वक्तव्यावर जोरदार टीकास्त्रे सोडले आहे. राज्यातील जनतेने महायुतीला सत्तास्थापनेसाठी जनादेश दिला असताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित करत धमकी दिली असून ही धमकी म्हणजे जनमताचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले. राष्ट्रपतींच्या नावाचा वापर करणे गैर असून राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का, असा संतप्त सवालही राऊत यांनी केला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडताना राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला जनादेश दिला असून आम्ही युतीधर्माचे पालन करू अशी भूमिकाही राऊत यांनी घेतली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सत्ता स्थापनेला विलंब होणे हे काही नवीन नाही, त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊ नये, तुमचे सर्व कारस्थान अपयशी ठरल्यामुळे ते अशी भाषा करत आहेत, हे नवनिर्वाचित आमदारांना घाबरवण्यासाठी आहे का, मराठी माणूस याला घाबरत नाही, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राची स्थिती पाहता,सर्वच पक्ष एकमेकांशी चर्चा करत आहेत, फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वगळता. मुहूर्त काढून सत्ता होत असेल तर मला आनंद आहे, पण सत्ता स्थापनेचा मुहूर्त असायला हवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

७ नोव्हेंबरपर्यंत सत्तेचा तिढा न सुटल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल.’ श्री. मुनगंटीवार व त्यांच्या पक्षाच्या मनात नेमके कोणते विष उसळते आहे ते या वक्तव्यावरून दिसते. कायद्याचा आणि घटनेचा अभ्यास कमी पडला की हे व्हायचेच किंवा कायदा अथवा घटनेची गळचेपी करून हवे ते साध्य करायचे ही भूमिकासुद्धा त्यामागे असू शकते. एक तर राष्ट्रपती आमच्या मुठीत आहेत किंवा राष्ट्रपतींच्या सहीशिक्क्याचा रबरी स्टॅम्प राज्यातील ‘भाजप’ कार्यालयात पडून आहे आणि आमचे राज्य आले नाही तर त्या रबरी शिक्क्याचा वापर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची आणीबाणी लादू शकतो असा या धमकीचा अर्थ आहे असे जनतेने समजायचे का?, असा सवाल शिवसेनेनं सामनामधून उपस्थित केला आहे.

दरम्यान या सगळ्याबाबत रावसाहेब दानवे यांना विचारलं असता, राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधी कोणतीही धमकी देण्यात आलेली नाही. सत्तास्थापनेसाठी एक विशिष्ट कालावधी असतो. या कालावधीत सरकार स्थापन होऊ शकलं नाही तर काय पर्याय उरतो? तोच पर्याय सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितला. त्यामध्ये धमकी किंवा इशारा असं काहीही नाही. संजय राऊत म्हणाले आहेत की युतीधर्माचं पालन करणार त्यांच्या या वक्तव्याचं स्वागत आहे असंही दानवे यांनी स्पष्ट केलं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(108)#Shivsena(897)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x